Skip to Main Content

Current Domain

 
 
 
 
 
भारतीय बिहाइव्हमध्ये आपले स्वागत !

भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे. आयुष्य जगण्याची वैविध्यपूर्ण शैली हा धागा विविधतेत एकतेची गुंफण करतो. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहताना असे दिसते की, आयुर्वेदापासून सुरु झालेला प्रवास आधुनिकतेकडे मार्गक्रमण करत आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या शक्तीने माणसाने अतुलनीय शोध लावले आणि त्याच्या जोरावर मनुष्याने प्रगती केली. भारतामधील विविध राज्यांची संस्कृती, परंपरा, भाषा, पेहराव, आहार, इत्यादींमध्ये भिन्नता असून  जागतिक स्तरावर ‘भारतीयांचे स्थान’ वेगळेपण दर्शवते.

आरोग्य, शिक्षण, रोजगार, पैसा आणि शेती हे पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. बदलत्या काळानुसार भारतीय जीवन पद्धतीचे स्वरूप हे बदलत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वेगाने घडणारे बदल माणूस आत्मसात करू लागला. परंतू माणसाचे प्राधान्यक्रम मुलभूत गोष्टींपासून दूरावले. आरोग्याच्या बाबतीत भुकेच्या वेळेला न जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम झाला. स्पर्धात्मक जीवन झाल्यामुळे रोजगारासाठी धावपळ सुरु झाली. तरुणांकडे व्यावसायिक शिक्षण नसल्यामुळे बाजारपेठेतील उपलब्ध नोकऱ्या त्यांना मिळत नाही. पैसा मिळवण्याचे वेगवेगळे पर्याय  उपलब्ध असून लोकांना त्याची  माहिती नाही. भारतीय लोकांसमोर विविध समस्यांसोबत अनेक प्रश्न देखील उभे राहिले आहेत.

इंडिया बिहाइव्ह संकेतस्थळाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पैसा, रोजगार आणि शेती यांविषयी मार्गदर्शन होईल. लोकांच्या  समस्या सोडवण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ते शोधण्याचा केलेला हा प्रयत्न...

In partnership with:

       Symantec

संपादकाची निवड

© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation