Skip to Main Content

Current Domain

वर्तमान विषय

 

नोकरीचा शोध

नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. नोकरीची माहिती वर्तमानपत्र, जाहिरात, संकेतस्थळ अशा अनेक ठिकाणी उपलब्ध असते. नोकरीचा शोध घेताना नोकरीसाठी अर्ज, बायो डेटा, मुलाखत, इत्यादी बाबींचा समावेश असतो.बायोडेटा हा आकर्षक असावा. मुलाखतीला स्वतःला प्रेसेंट करण्याबद्दल मार्गदर्शन घ्यावे. नोकरीसाठी स्वतःचा आत्मविश्वास हा मुलाखतीतला महत्त्वाचा भाग आहे.

नवीन नोकरी सुरु करताना | नोकरीसाठी अर्ज कसा करावा | बायो डेटा तयार करण्यासाठी | स्वत:ला प्रेसेंट करताना मुलाखती वेळी | नेटवर्किंग 

उद्योजकता

व्यवसायातूनच मोठ्या उद्योगाला चालना मिळते. व्यवसाय सुरु करताना त्याबद्दलची इत्यंभूत माहिती प्राप्त करून घ्यावी. व्यवसाय सुरळीत चालू असल्यास त्याच्या वाढीसाठी प्रयत्न करावे. व्यवसायाचे नियत्रण हे नियम आणि शिस्तीने व्हायला पाहिजेत, नंतर व्यवसायाचे रुपांतर उद्योगात होईल. उद्योग हा आर्थिक विकासाचा मुलभूत पाया असतो.

स्वतःचा व्यवसाय सुरु कराव्यवसायावर नियंत्रण ठेवा आपल्या व्यापाराची वृद्धी करा 

करिअर प्रशिक्षण

करियर प्रशिक्षण घेणे हे स्पर्धात्मकदृष्टीने महत्वाचे आहे. स्वतःच्या करियरचा विचार हा अभ्यासपूर्ण करून त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. रोजगाराच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. स्वयं रोजगारात धाडसाने पाउल टाकून यशस्वी झाले पाहिजे. आयुष्याची वाटचालीमध्ये करियर प्रशिक्षण जबाबदारीने पार पाडले पाहिजे.

ध्येय ठरवणे करिअरचे नियोजन | वेगवेळ्या उद्योग क्षेत्रातील करिअर रोजगार सक्षम कसे राहालस्वयंम रोजगार | जास्त पैसे कमविण्यासाठी

संगणक साक्षरता 

संगणक हे एक असे यंत्र आहे की आज कार्यालयात किंवा घरात सगळीकडे त्याचा वापर हा अनिवार्य आहे. म्हणून संगणक शिकणे गरजेचे आहे. संगणक शिकणे पूर्वीपेक्षा अलीकडच्या काळात सोपे झाले आहे.

वेब व इंटरनेट |ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन संवाद | ऑनलाईन खरेदी

संघटन कुशलता 

संघटन कुशलता ही सामुहिक जबाबदारी आहे. कंपनी किवा संस्थेतील  कामे ही सांघिकरित्या होतात. प्रकल्पाचे आयोजन आणि नियोजन हे प्रत्येक व्यक्तीला वाटून दिलेले असते. भागीदारीचा व्यवसाय (पार्टनरशिप बिझनेस), उत्पादन आणि विपणनमध्ये (सेल्स अन्ड मार्केटिंग) संगठन कुशलतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. सर्व कामे ही संगठन कौशल्यानेच पूर्ण होतात.

नियोजन व आयोजन  प्रोजेक्ट व्यवस्थापन सार्वजनीक संभाषण | भागीदारीचा व्यवहार निगोसिएशन | सेल्स आणि मार्केटिंग 

कामाच्या ठिकाणी

जेथे आपण काम करतो, त्या ठिकाणी वावरण्याची सकारात्मक पद्धत आत्मसात केली पाहिजे. कामाचे आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. वरिष्ठांच्या आज्ञेनुसार प्रत्येक काम वेळेवर आणि प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहीजे. कार्यालयीन राजकारणापासून दूरच राहिलेले चांगले...! कार्यालयीन सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे. अधिकाऱ्यांशी संभाषण करताना विनम्रता आणि शिष्टाचार पाळले पाहजे. कामाच्या ठिकाणी चांगले आचरण ठेवल्यास कार्यालयीन प्रगतीत फायदा होतो.

कामाच्या ठिकाणी आचरण | वेळेचे आणि ताणाचे व्यवस्थापन | संभाषणातील शिष्टाचार | टीमवर्क

 

© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation
अधिक पहा